नेहमीच अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ होत असेल तर करा पाण्याचा घरगुती सोपा उपाय

नेहमीच अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ होत असेल तर करा पाण्याचा घरगुती सोपा उपाय

बऱ्याच लोकांना काही खाल्ल्यावर किंवा प्यायल्यावर अ‍ॅसिडिटीची समस्या होते. अ‍ॅसिडिटी झाल्यावर पोटात जळजळ, गॅस, आंबट ढेकर, जडपणा अशा समस्या जाणवतात. अ‍ॅसिडिटी झाल्यावर होणाऱ्या त्रासामुळे कशात लक्षही लागत नाही. सामान्यपणे खूप जास्त खाल्ल्यानं, उशीरा खाल्ल्यानं, फार जास्त तेलकट खाल्ल्यानं, खराब झालेलं काही खाल्ल्यानं किंवा झोपेची कमतरता यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या होते. आजकाल तर जेवण झाल्यावर अ‍ॅसिडिटी होणं अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तुम्हाला सुद्धा काही खाल्ल्यावर अ‍ॅसिडिटी होत असेल तर डॉक्टरांनी यावर एक सोपा उपाय सांगितला आहे.

अ‍ॅसिडिटी दूर करण्याचा सोपा उपाय

डॉ. रवि के गुप्ता सांगतात की, जेवण केल्यावर अ‍ॅसिडिटी होत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर थंड पाणी ही समस्या दूर करण्यास मदत करतं. पण थंड पाणी एकदम प्यायचं नाहीये. तर हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवायचं आहे. त्यानंतर प्यायचं आहे. यानं वेगस नर्व स्टिम्यूलेट होते, पोटातील अ‍ॅसिड्स न्यूट्रलाइज होताच आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स स्लो होतं. थंड पाणी अशाप्रकारे तोंडा ठेवून नंतर प्यायल्यानंतर 2 ते 3 तास काहीच खाऊ नका. यानं अ‍ॅसिडिटी कंट्रोल होईल.

इतरही काही उपाय

अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती देखील फायदेशीर ठरतात. बडीशेप यासाठी मदत करेल. जेवण झाल्यावर बडीशेपचे थोडे दाणे खा आणि वरून पाणी प्या. किंवा तुम्ही बडीशेपचं पाणी सुद्धा पिऊ शकता. यानं अ‍ॅसिडिटी दूर होईल.

जिऱ्याचं पाणी पिणं देखील अ‍ॅसिडिटीमध्ये फायदेशीर ठरतं. एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात टाकून उकळा  आणि नंतर हे पाणी गाळून कोमट असताना प्या.

जेवण झाल्यावर एक किंवा दोन लवंग चघळल्यानं देखील अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळेल. फक्त लवंग जास्त खाऊ नका. तसेच वेलची चावून खाल्ल्यानं पचनास मदत मिळते. तसेच अ‍ॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.