महिलेस शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरुद्ध तक्रार

महिलेस शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरुद्ध तक्रार

सातारा : महिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी फिरोज शेख (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.