सातारा : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाने दोन जणांची सुमारे सव्वा सहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधिता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश नंदकुमार शिंदे (रा.बोरगाव ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनिषा संभाजी कार्वकर (वय ३७, रा. संगमनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार यांची २ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहेत. तसेच त्यांच्याप्रमाणेच विशाल विकास चांदणे (रा.धाराशिव) यांचीही संशयिताने ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडली आहे.