सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जमीन गटाच्या वादातून मारहाण करत चावल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय भानुदास देवकर (वय 48, रा. देवकरवाडी पो.निगडी ता.सातारा) यांनी अमित देवकर व अजित देवकर या दोघांविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 27 डिसेंबर रोजी घडली आहे.