कौटुंबिक वादातून पतीने पेटवले घर

कौटुंबिक वादातून पतीने पेटवले घर

सातारा : आंबवडे खुर्द, ता.सातारा येथे पत्नीच्या घरी येवून घर पेटवून नुकसान केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शैलेश नारायण बाबर (रा.वेळेकामथी ता.सातारा) याच्या विरुध्द प्रियांका शैलेश बाबर (वय 27, रा. आंबवडे खु. ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पत्नी आंबवडे खु. येथील घरी असताना तेथे पती आला. दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. या वादातून पतीने घरात पेट्रोल शिंपडून आग लावून दिली. या आगीत संसारउपयोगी साहित्य, महत्वाची कागदपत्रे, सोने असे जळून खाक झाले.