सातारा : विवाहितेला माहेरहून पैसे आण, असे म्हणत जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा मनोज मोरे (वय २७, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी मनोज मोरे, महादेव मोरे, अलका मोरे (तिघेही रा. पुणे) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०२५ पर्यंत घडली आहे. तसेच मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.