सातारा : कार अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत जुना पुणे सातारा महामार्गावर बिपिन भीमराव पावले यांनी त्याच्या ताब्यातील कार क्र. एमएच 12 एलपी 0346 बेदरकारपणे, भरधाव वेगात चालवल्याने रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.