सातारा : सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान मनोज बाळकृष्ण जाधव यांच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये असणाऱ्या बंगल्यातील किचनचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कापून घरातील 20 हजार रुपये किंमतीचे चांदीचे साहित्य व घड्याळे चोरून नेली आहेत. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.