सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास दशरथ दत्तात्रय जाधव रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे याने त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन बेदरकारपणे, भरधाव वेगात चालवून सातारा ते पिंपोडे बुद्रुक जाणाऱ्या अमीर अर्जुन लेंभे यांची दुचाकी क्र. एमएच 48 एझेड 1998 ला जोरदार धडक दिली. या धडकेत लेंभे गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.