सातारा : अस्तित्व लपविल्याप्रकरणी एकावर
सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, संगम माहुली, सातारा येथे चेहरा लपवून
फिरत असताना संजीत कृष्णा दास (वय 22, मूळ रा.बिहार) याला
पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई दि. 23 ऑक्टोबर रोजी केली असून शहर पोलीस
ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.