सातारा : विनायक रामचंद्र शेडगे (वय ३८, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी मंदीरात वीज जोडत असताना घडली. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृ्त्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.