गुटखा व्यापाऱ्याच्या बंगल्यावर छाप

गुटखा व्यापाऱ्याच्या बंगल्यावर छाप

फलटण : शहरातील लक्ष्मी नगर परिसरात असणाऱ्या एम. आरमगम या बंगल्यावर आज सकाळी पावणे बारा वाजण्‍याच्या सुमारास पोलिस व अन्न व भेसळ विभाग सातारा यांनी छापा टाकला. यामध्ये गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. अन्न व भेसळ अधिकारी व शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी केली असून गुटखा व रोख पैसे तसेच दागिने याचे मोजमाप सुरू आहे.
यामध्ये लहान मुलांसाठी अनेक खाद्यपदार्थ असलेले डुप्लिकेट कंपनीची अनेक पाकिटे सापडली असून यावर कंपनींच्या एफएसएसआयच्या नोंदीदेखील आढळून येत नाहीत. सध्या फलटण शहरात गुटख्याची विक्री सर्रास सुरू असून एक महिन्यांपूर्वी जिंती नाका येथे छापा टाकण्‍यात आला होता. त्यामध्येदेखील गुटखा सापडला होता.

Advertisement