बोरखळच्या कपिल नलवडेचा यूपीएससीत डंका

बोरखळच्या कपिल नलवडेचा यूपीएससीत डंका

शिवथर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने युपीएससी घेण्यात आलेल्या परीक्षेत सातारा तालुक्यातील बोरखळ गावातील कपिल लक्ष्मण नलवडे याने देशात ६६२वी रँक सह सनदी अधिकारी बनून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

कपिलचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील सातारा तालुक्यातील वडूथ येथल न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडूथ येथे झाले. कपिलने इयत्ता दहावी मध्ये 92 टक्के मार्क मिळवून वडूत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. दहावीनंतर त्याने पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत सर परशुराम भाऊ कॉलेजमधून फिजिक्स विषयासह बी.एस.सी. ची पदवी संपादन केली. कपिलचे वडील लक्ष्मण बबन नलवडे हे सरकारी पणन संस्थेत ऑडिटर म्हणून काम करत होते. कपिल कॉलेज शिकत असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. 

वडिलांचा आवडता खेळाडू कपिल देव होता कपिल देवची जन्मतारीख 6 जानेवारी होती. व कपिलचेही जन्मतारीख 6 जानेवारी असल्याने वडिलांनी कपिल हे नाव ठेवले होते. कपिलने सरकारी सेवेत यश मिळवावे हे वडिलांचे स्वप्न होते. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कपिले गेले चार वर्षे अहोरात्र प्रयत्न करून घवघवीत यश संपादन कपिलला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याचा छंद होता त्याने तालुका स्तरावरील मॅचेस मध्ये भाग घेऊन चांगले कामगिरी केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिलच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आई शोभा नलवडे यांच्यावर पडली होती. 

कपिलच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने शेतामध्ये काबाडकष्ट करून व घरचे संपूर्ण जबाबदारी पाहून कपिलच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली म्हणूनच कपिलला यश संपादन करता आले. त्याचबरोबर वडूत येतील कपिलचे मामा दीपक मोरे व संदीप मोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.  बिकट परिस्थितीचा सामना करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून कपिलने यश संपादन केल्याबद्दल वडूथ, बोरखळ व परिसरातून कपिलचे अभिनंदन केले आहे.