सातारा शहर परिसरातून ट्रकची चोरी

सातारा शहर परिसरातून ट्रकची चोरी

सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने ट्रकची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 16 ऑगस्ट दरम्यान नानाजी तुळजीराम कांबळे रा. गडकर आळी, सातारा यांचा सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचा ट्रक क्र. एमएच 04 जेके 0780 अज्ञात चोरट्याने चाहूर खेड येथील दुकानाच्या शेजारून चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.