सातारा : दारूच्या नशेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास धनंजय चंद्रकांत बनसोडे रा. वनवासवाडी, सातारा हे दारूच्या नशेत हॉटेल मनोज बार नवीन एमआयडीसी, सातारा येथे बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे समजल्याने त्यांच्या भावाने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास एपीआय केणेकर करीत आहेत.