विवाहितेचा जाचहाट प्रकरणी तीनजणांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट प्रकरणी तीनजणांवर गुन्हा

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रणव सावंत, श्रीरंग सावंत, सुरेखा सावंत (गडकरआळी, सातारा) यांच्या विरुध्द पुजा प्रणव सावंत (वय 25, रा. राधिका रोड मूळ रा.गडकरआळी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. जून 2023 पासून वेळोवेळी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.