एकास धमकी दिल्या प्रकरणी समीर कच्छी विरोधात तक्रार

एकास धमकी दिल्या प्रकरणी समीर कच्छी विरोधात तक्रार

सातारा : मागील केसच्या कारणावरून एकास धमकी दिल्या प्रकरणी समीर कच्छी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोर्टात सुरु असलेल्‍या केस वरुन समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातरा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्‍ह्याची नोंद झाली आहे. ही धमकी सातारा जिल्‍हा न्‍यायालयाच्या परिसरात दि. ७ डिसेंबर रोजी घडली असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. अरुण रामचंद्र माने (वय ४९, रा. पाटखळ माथा ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.