सातारा : वीज चोरी प्रकरणी दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली, देगाव येथे ब्लॅक ऍपल रेस्टॉरंट येथे चोरुन वीज घेतल्याप्रकरणी हर्षद चंद्रकांत भोसले, श्रीरंग एकनाथ शेडगे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. वर्षा गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवा. माने करीत आहेत.