जिल्ह्यामध्ये 22 हजार दुबार नावे असल्याचे निष्पन्न; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

जिल्ह्यामध्ये 22 हजार दुबार नावे असल्याचे निष्पन्न; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

सातारा  : सातारा जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुबार नावांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.  या प्रक्रियेत 65,587 नावे प्राप्त झाली असून 22000 नावे जिल्ह्यात दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच 1 जुलै 2025 ची मतदार यादी यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम यंत्राची उपलब्धता करण्यात आली असून ही यंत्र इतर राज्यातून मागवण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरावर बैठका घेण्यात आले आहेत. ईव्हीएम यंत्रासाठी स्ट्रॉंग रूम निश्चित करण्यात आल्या असून राजकीय पक्षांबरोबर गुरुवारी सकाळी 11 वाजता बैठक घेतली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक नियमावलीची सविस्तर माहिती दिली जाणारा असून अधिसूचनेच्या संदर्भाने प्रकाशन कार्यक्रम निर्देशित केला जाणार आहे. निवडणूक विषयक कामांसाठी एक खिडकी सेवा सुरू करण्यात येणार आहे दुबार मतदारांची यादी तपासणी राज्य निवडणूक राज्य निर्देशानुसार पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 22000 नावे जिल्ह्यातून दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणारा सून एक जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्याचे दृष्टिक्षेपातील चित्र

अकरा तालुके -65 गट आणि 130 ग ण

एकूण मतदार 21 लाख 94 हजार

2877 मतदान केंद्रांची व्यवस्था