सातारा : सातारा शहर परिसरात वेगवेगळ्या दोन घटनेत दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीवाय 6692 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 6 ऑगस्ट रोजी घडली असून याप्रकरणी विक्रम राजेंद्र जाधव (वय 32, रा. भाटमरळी ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
दुसरी तक्रार गणेश अशोक भोसले (वय 36, रा.अतित ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 जुलै रोजी वायसी कॉलेज समोरील यशोधन कॉम्प्लेक्समधील पार्कींगमध्ये घडली आहे.