मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रकाश आंबेडकर यांनी दिला मोठा सल्ला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रकाश आंबेडकर यांनी दिला मोठा सल्ला

मुंबई : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एका वक्तव्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. राज्यात सध्या आरक्षण बचाव आणि आरक्षण द्या यावरून धूमश्चक्री उडली आहे. राजकारण तापले आहे. आहे रे आणि नाही रे मधील हा संघर्ष दिवसागणिक तीव्र होत आहे. अर्थात त्याला विधानसभा निवडणुकीची किनार आहे, हे न ओळखणारे मतदार दूध खुळे नाहीत. या घडामोडीतच प्रकाश आंबेडकरअसा सल्ला राज्यातील या दोन मोठ्या नेत्यांना दिला आहे.

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावरून गोंधळ

सध्या राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून एकच गोंधळ उडाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आरक्षणासाठी पुन्हा हुंकार देण्यात आला. गेल्या सहा ते आठ वर्षात मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले आहेत. यावेळी महायुती सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक पाऊल टाकले आहे. तर सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यावरून गदारोळ सुरू आहे.