नाबार्डकडून कर्ज मंजुरीच्या अमिषाने कृष्णानगर येथील आदर्श बचत गटातील महिलांची फसवणूक

नाबार्डकडून कर्ज मंजुरीच्या अमिषाने कृष्णानगर येथील आदर्श बचत गटातील महिलांची फसवणूक

सातारा : नाबार्डकडून 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून, उषा राजेंद्र पाटील (वय 60, गुरुदत्त कॉलनी, रा. संगमनगर) आणि कृष्णानगर येथील आदर्श बचत गटातील 20 महिलांची एकूण 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अलका प्रवीण पाटील (रा. 269, शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उषा राजेंद्र पाटील आणि आदर्श बचत गटातील महिलांना नाबाकर्डकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत, वाई येथील प्रगती महिला कल्याणकारी शैक्षणिक संस्थेची सभासद फी म्हणून, प्रत्येकी दोन हजार रुपये भरून घेण्यात आले. मात्र, त्या महिलांना कर्ज मंजूर झाले नाही. याप्रकरणी अलका प्रवीण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक पवार तपास करत आहेत.