सातारा : पोलीस ठाण्यात शांततेचा भंग
केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, दि. 2 रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास विवेक
ज्ञानदेव शिंदे, विद्या विवेक शिंदे, ओंकार मारुती शिंदे, विनय हिंदुराव शिंदे सर्व राहणार पाटखळ, ता. सातारा हे सातारा तालुका पोलीस ठाण्यात
एकमेकांच्यात असलेल्या दिवाणी दाव्याच्या कारणावरून मोठमोठ्याने आरडाओरडा करून
शांततेचा भंग करीत होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पिसाळ करीत आहेत.