१० तास वाट पाहूनही मुख्यमंत्री शिंदेनी भेट नाकारली!

१० तास वाट पाहूनही मुख्यमंत्री शिंदेनी भेट नाकारली!

मुंबई : पेसा कायद्यांतर्गत आदिवासी मुलांची भरती व्हावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 सप्टेंबरला हा निर्णय सोडू असं आश्वासन दिलं होतं आता महिना झाला मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. याचसंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह राज्यातील आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच तास थांबून देखील भेट दिली नसल्याचे समोर आले आहे. 

आता सर्व संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेसा कायद्या अंतर्गत भरती करण्यासंदर्भात अनेक आदिवासी मुलं नरहरी शिरवळ यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 सप्टेंबरला हा निर्णय सोडू असं आश्वासन दिलं होतं आता महिना झाला मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आमदारांनाही ताटकळत थांबावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दुपारी ३ वाजता गेलेले आमदार रात्री १०.३० वाजेपर्यंत वेटींगवरच होते. आदिवासी आमदार दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ६ तास सह्याद्री अतिथीगृह तर अडीच तास वर्षावर ताटकळत थांबले. 

धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्र्याच्या कर्मचाऱ्यांकडून आमदार-खासदारांना उडवाउडवीची उत्तर दिली. तसेच उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांचा प्रोटोकॉल देखील काल पाळण्यात आला नाही. ज्यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बोलवतात त्यावेळी त्यांना भेटायला जाणं हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे मात्र तरीसुद्धा काल मुख्यमंत्री भेटले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यानंतर आता आदिवासी नेत्यांसह संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. उद्यापासून राज्यातील सर्व हायवे रोखण्याचं काम आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आज साडेदहा वाजता सुरुची येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे आणि आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.