कुत्रे चावल्याने कुत्रा मालकावर गुन्हा

कुत्रे चावल्याने कुत्रा मालकावर गुन्हा

सातारा : कुत्रे चावल्याने कुत्रा मालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास गणेश लावंड रा. शिवसुंदर कॉलनी, संगम माहुली, सातारा यांनी त्यांचे पाळीव कुत्रे दोरीने न बांधता हलगर्जीपणाने मोकळे सोडल्याने ते कुत्रे तेथीलच शांता सुरेश शिंदे यांना चावले. याप्रकरणी लावंड यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.