सातारा : जबरी चोरी प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रोहित विजय कुंभार रा. कुंभारवाडा, करंजे, सातारा हा सातारा बस स्थानकासमोरील एका चायनीज सेंटरच्या येथून शरद मदन मलिक सध्या रा. बसाप्पा पेठ, सातारा यांचा मोबाईल फोन आणि 700 रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेला. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.