किडनी फेल होणे ही एक गंभीर स्थिती आहे ज्यात किडनी योग्यरित्या काम करणं थांबवतं. किडनी शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचं काम करतात. ते ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास, शरीरातील मिनरल्स संतुलन राखण्यास आणि RBC तयार करण्यास देखील मदत करतात. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते आणि जर उपचार केले नाहीत तर ते जीवघेणं ठरू शकतं.
किडनी फेल होण्याची
कारणं
१) डायबेटीस : किडनी
फेल होण्यास पहिलं कारण म्हणजे डायबेटीस. डायबेटीस असलेल्यांना किडनी फेल होण्याचा
धोका जास्त असतो. दीर्घकाळ ब्लड शुगर जास्त असल्यास किडनीच्या नसा खराब होतात.
हळूहळू हे फिल्टर योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ काढून
टाकण्याची क्षमता कमी होते.
२) हाय ब्लड प्रेशर :
हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना किडनी फेल होण्याचा धोका जास्त असतो. हाय ब्लड
प्रेशरमुळे किडनीच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडतो. कालांतराने, या रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि किडनी
रक्त योग्यरित्या स्वच्छ करू शकत नाहीत. यामुळे नुकसान होऊ शकतं, अगदी किडनी फेल देखील होऊ शकते. यामुळे
किडनी इन्फेक्शन, स्टोनचा
त्रास होतो.
किडनी फेल होण्याचे
प्रकार :
१) Acute
Kidney Failure : हे
काही दिवसांत किंवा आठवड्यात अचानक होतं. कधीकधी औषधं, इन्फेक्शन किंवा दुखापतींमुळे किडनी
अचानक कमकुवत होते. उपचारानंतर बरं होता येतं.
२) Chronic
Kidney Failure : ही
समस्या काही महिने किंवा वर्षांमध्ये हळूहळू वाढते. या स्थितीत किडनी हळूहळू कार्य
करणं थांबवते आणि पूर्णपणे खराब देखील होऊ शकते.
हात, पाय
किंवा चेहऱ्यावर सूज येणं.
थकवा आणि अशक्तपणा
जाणवणं.
लघवीचे प्रमाण कमी होणं.
मळमळ, उलट्या,
भूक न लागणं.
श्वास घेण्यास त्रास
होणं किंवा छातीत जडपणा.
लक्ष केंद्रित करण्यात अडचण.
खाज सुटणे किंवा कोरडी त्वचा.
किडनी निरोगी
ठेवण्यासाठी ब्लड शुगर साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे.
यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्या शिवाय
कोणतीही औषध घेऊ नका. योग्य आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. जर डायबेटीस किंवा
ब्लड प्रेशर असेल तर नियमितपणे किडनीची तपासणी करणं गरजेचं आहे.