संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा घरी सोप्या पद्धतीमध्ये नाचोज चाट

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा घरी सोप्या पद्धतीमध्ये नाचोज चाट

संध्याकाळच्या वेळी नाश्त्यात अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. कांदाभजी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ किंवा इतर चमचमीत पदार्थांचे सेवन केले जाते. कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढवण्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळयाच्या नाश्त्यात नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या रंगीत भाज्या आणि सॉसपासून बनवलेले चाट चवीला अतिशय सुंदर लागते. तिखट, आंबट गोड चवीचे चाट सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे नाश्त्यात कायमच विकत मिळणाऱ्या तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

कांदा

टोमॅटो

नाचोज

शिमला मिरची

चिंच चटणी

हिरवी चटणी

टोमॅटो सॉस

जिऱ्याची पावडर

चाट मसाला

लिंबाचा रस

पनीर

मोझरेला चीज

 

कृती:

नाचोज चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या धुवून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्या.

मोठ्या ताटात नाचोज घेऊन त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर चिंच चटणी आणि हिरवी चटणी टाका.

त्यानंतर चवीसाठी टोमॅटो सॉस, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कुसकरलेले पनीर टाका.

चाटची चव आणखीन वाढवण्यासाठी किसून घेतलेले चीज आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचोज चाट. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.