खंडाळा तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग

खंडाळा तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग

सातारा : खंडाळा तालुक्यात एका ठिकाणी येथे अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी 24 वर्षे युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. योगेश धर्मराज बामणे वय- 24 राहणार, भादे, तालुका खंडाळा असे या युवकाचे नाव आहे. 

या युवकाने दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान संबंधित युतीच्या घरासमोर येऊन दारू पिऊन गोंधळ घातला तसेच तिच्या वडिलांना युवतीचे लग्न करण्यासंदर्भात हट्ट धरला. युवतीच्या वडिलांनी नकार दिला असता, त्याने फिर्यादीचा हात पकडून लज्जास्पद वर्तन केले. तसेच आई-वडिलांना हाताने मारहाण करून दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार केके कामठे करत आहेत.