सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, दोन वर्षांसाठी
हद्दपारीचे आदेश असतानाही ऋतिक ऊर्फ बाबा अजय जाधव (वय 22, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) हा दि. 8 रोजी सदरबझारमध्ये फिरताना आढळून आला. त्याच्यावर
आदेशाचा भंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस
हवालदार मेचकर तपास करत आहेत.