सातारा : खासगी सावकारीतून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी सावकाराविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्याजाने गहाण ठेवलेल्या 33 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पैसे देवून परत मागितली असता ती परत न करता दिलेल्या पैशांना दिवसाला 10 हजार रुपयांचे व्याज मागून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तन्यम मंत्री (रा.शाहू चौक, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रल्हाद लक्ष्मण साळुंखे (वय 61, रा. आंबेघर ता.जावली) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयिताने तक्रारदार यांचा मुलगा यांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना 11 जानेवारी घडली आहे.