सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाचा विकास काय करणार आहोत, याची विकासाची ब्लू प्रिंटही उमेदवार जाहीर करत आहेत. सातारा - जावळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रश्न -समस्या - मार्ग -विकास या टॅगलाइनखाली विकासाची ब्लू प्रिंट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण भागाचा कायापालट, लोकांचे जीवनमान उंचावणे, पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जाहीर केले आहे. मतदारसंघातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी मायक्रोप्लॅनिंगनुसार करण्यासाठी आपण कायम उपलब्ध राहणार असल्याचे अमित दादा यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी नेमके काय म्हटले आपल्या जाहीरनाम्यात ते आपण पाहू.
सातारा शहर
१) पाणी प्रश्न, कचरा निर्मूलन व स्वच्छता राखणे
२) सत्ता ब प्रकार व शासनास देण्याची रक्कम माफ करून मार्ग काढू
३) प्रशासनावर पकड
४) व्यवसायिकांना होणाऱ्या त्रासाला आळा घालणे
५) कर्मचाऱ्यांना शासकीय कामात अडथळा व दबाव न आणणे
६) ठेकेदारांनी दर्जात्मक कामे न केल्यास ब्लॅक लिस्ट मध्ये समावेश करणे
७) शहर सुशोभीकरण व शहराचा दर्जा कसा वाढेल यासाठी कटिबद्ध राहू. यासाठी सर्वत्र समिती स्थापन करू
८) एमआयडीसी विकास व बाहेरून उद्योग आणण्यास कटिबद्ध
९) आयटी कंपनीसाठी सर्वत्र डेव्हलपमेंट प्लॅनिंग करून कंपनी आणण्यासाठी कटिबद्ध
१०) सातारा शहरातील नागरिकांसाठी दोन्ही टोलनाके बंद करू
११) रोजगार व कुशल कामगार बनवण्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारू. त्यासाठी सर्वत्र विभाग तयार करू.
१२) पर्यटनावर भर देऊन स्थानिक नागरिकांना व्यवसाय देण्यासाठी कटीबद्ध
१३) शिक्षणाचा दर्जा व नंदनवन करून मुलांना सातारा शहरात रोजगार मिळवून देण्यास कटीबद्ध
मतदारसंघातील परळी व जावळी या ग्रामीण विभागातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की,
१) परळी व जावळी खोऱ्यातील दुर्गम भागातील दळणवळण सुविधा देणार व प्रामाणिक ठेकेदारांना प्राधान्य
२) स्थानिक समस्या गावनिहाय सोडवण्यासाठी आग्रही राहणार
३) मुंबईमध्ये स्वतंत्र समिती स्थापन करून तेथील नागरिकांना समस्या सोडवण्यास व व्यवसाय प्रशिक्षण शिबिर राबवणार
४) मुंबई, पुणे येथील लोकांसाठी स्वतंत्र मदत (कक्ष) क्रमांक व्यवस्था स्थापन करणार
५) महू हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणे
६) पर्यावरण जतन करून डेव्हलपमेंट करणे. स्थानिक नागरिक, युवकांना रोजगार उपलब्ध करणे
७) ग्रामीण भागात उत्तम शिक्षणाची उपलब्धता करून देणे
८) उरमोडी धरणग्रस्तांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार