सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरफळ, ता. सातारा गावच्या हद्दीतील भारत पेट्रोलियम पंपा समोर परमेश्वर बालाजी दहिफळे रा. अहमदपूर, जि. लातूर याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्र. एमएच 09 इएम 5727 वेगाने चालवून ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक मध्ये बसलेली एक युवती जखमी झाली. तसेच ट्रक मधील मालाचे नुकसान झाले. या प्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक व्ही. व्ही. मोरे करीत आहेत.