सातारा : तालुक्यातील मौजे फडतरवाडी अंगापूर रस्ता डोबा शिवारापासून महावितरणच्या डीपी मधून अज्ञाताने दि १० रोजी ४० हजार रुपये किमतीची २०० किलो वजनाची अल्युमिनियमची तार चोरी केली आहे. याप्रकरणी पुरूषोत्तम नारायण जाधव (वय ३८, रा दत्तनगर,कोडोली) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.