अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोड करीत आहेत.