सातारा : मागच्या महिन्यात मार्केट यार्ड परिसरातील झालेल्या अपघात प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 मार्च 2025 रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील राधिका सिग्नलच्या पाठीमागे शिवाजी राजाराम मोरे रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील एक्टिवा मोटरसायकल क्र. एमएच 11 सीएस 2889 विना हेल्मेट, विना मोटरसायकलचा इन्शुरन्स काढता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली. यात मोटरसायकल स्लिप होऊन शेजारून जाणाऱ्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड करीत आहेत.