सातारा बसस्थानकातून सुमारे सव्वा लाखांच्या मंगळसूत्राची चोरी

सातारा बसस्थानकातून सुमारे सव्वा लाखांच्या मंगळसूत्राची चोरी

सातारा : सातारा बसस्थानकातून अज्ञात महिलेने सुमारे सव्वा लाखांच्या मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा बसस्थानकामध्ये अज्ञात महिलेने 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण लांबवले. ही घटना दि. 20 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी सौ.मीनाक्षी शेखर घोडके (वय 48, रा. कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.