मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी आठ वाजण्याच्या सुमारास देगाव तालुका सातारा येथे तेथीलच श्रीरंग रामचंद्र जाधव यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच रामचंद्र यशवंत खुडे, रुपेश रामचंद्र खुडे, उद्धव मोहन खुडे, रणजीत वसंत खुडे, शिवाजी लक्ष्मण खुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.

तर दुसऱ्या तक्रारीत, रामचंद्र यशवंत खुडे यांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीरंग रामचंद्र जाधव, अविनाश श्रीरंग जाधव, शंकर साहेबराव जाधव, अल्पना श्रीरंग जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.