सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार दि. 16 रोजी दुपारी 1.30 वाजता घडला. पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानवी यांनी फिर्याद दिली असून, निलेश पोपट घाडगे (वय 31, रा. मोह, ता. खटाव), संतोष अंकुश देवरुखे (वय 45, रा. डबेवाडी, ता. सातारा) यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दुसर्‍या घटनेत, येथीर रिमांड होम ते सदरबझारकडे जाणार्‍या ठिकाणी संतोष सुरेश खोचीकर, आलका सुरेश खोचीकर, लक्ष्मी शिवाजी खोचीकर (सर्व रा. धनश्री कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी दि. 16 रोजी रात्री 11.10 वाजता पोलिसांसमोर वाद घालत सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलीस हवालदार महेेंद्र पाटोळे यांनी फिर्याद दिली असून, तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.