सातारा : सुमारे 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सप्टेंबर 2022 ते जुलै 2023 दरम्यान दादा यशवंत दडस रा. टाकेवाडी, ता. माण याने सुनील शिवाजी निकम रा. सदर बाजार, सातारा यांच्यासह 16 जणांना शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून पहा, मी एक लाख रुपये 15 महिन्यांसाठी ठेवून घेऊन त्याचे दरमहा 12 हजार रुपये हप्त्याने रक्कम माघारी देणार आहे, असे सांगून निकम तसेच अन्य लोकांचा विश्वास संपादन करून एकूण 41 लाख 61 हजार चारशे रुपये घेऊन त्यांना ठरल्याप्रमाणे कोणताही मोबदला न देता तसेच निकम व इतर लोकांचे पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी दडस याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.