सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुत्रा आमच्या घरासमोर फिरवू नका, असे म्हटल्याच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संकेत सपकाळ व अक्षय सपकाळ या दोघांविरुध्द बकुल बबनराव बोराटे (वय 44, सर्व रा. संगम कॉलनी, माहुली ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 मार्च रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.