बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी

सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीएस 8375 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 26 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी राजू सोमनाथ रेड्डी (वय 24, रा.गोडोली, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवा. पोतेकर करीत आहेत.