पोक्सो सह बालविवाह अंतर्गत पाच जणांवर गुन्हा

पोक्सो सह बालविवाह अंतर्गत पाच जणांवर गुन्हा

सातारा : पोक्सो सह बालविवाह कायद्याअंतर्गत पाच जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पती आकाश दत्तात्रय दणाणे, सासू संगीता दत्तात्रय दणाणे, सासरे दत्तात्रय महादेव दणाणे सर्व रा. करंजे पेठ, सातारा आणि आई कोमल सचिन खिलारे, वडील सचिन पोपट खिलारे दोन्ही रा. कोरेगाव, ता. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.