विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि 10 ऑक्टोबर 2010 पासून ते 26 सप्टेंबर 2024 अखेर मधुमती रवींद्र रणबागले रा. करंजे, सातारा यांना शिवीगाळ मारहाण केल्याप्रकरणी पती रवींद्र शंकर रणबागले, सासरे शंकर रणबागले, सासु शांता शंकर रणबागले सर्व रा. करंजे, सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.