दादा महाराजांच्या स्मृतीस खासदार उदयनराजे भोसले यांचे अभिवादन

दादा महाराजांच्या स्मृतीस खासदार उदयनराजे भोसले यांचे अभिवादन

सातारा : सातारा नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या पवित्र स्मृतीस खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक उद्यान गोडोली येथे अभिवादन सोहळा कार्यक्रम पार पडला. त्या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती चे माजी अध्यक्ष महेश जाधव, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, सातारा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, विजय बडेकर, माजी उपनगराध्यक्ष ऍड दत्तात्रय बनकर, मनोज शेंडे, माजी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, प्रशांत आहेरराव, कल्याण राक्षे, संग्राम बर्गे, संजय सुर्यवंशी, विलास शिंदे, खेड ग्रामपंचायत उपसरपंच सुधीर काकडे, भारतीय जनता पक्षाचे सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, विक्रम बोराटे, विठ्ठल जाधव, हेमंत सावंत व उदयनराजे मित्र समूहाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.