मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी

मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी

सातारा : शहरातील मंगळवार पेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 60 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी दुपारी 5 ते रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान पूजा भालचंद्र छप्परकर रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्या राहत्या घराचे कुलूप काढून, घरातील कपाटाचे दार उचकटून अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीची, दीड तोळे वजनाची सोन्याची माळ चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक यादव करीत आहेत.