अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 जानेवारी रोजी वाढे गावच्या पिकअप शेड समोर असलेल्या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला सौ. तानुबाई रामचंद्र नलवडे रा. वाढे, ता. सातारा या जखमी झाल्या होत्या. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.