सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी ते 20 जुलै 2024 दरम्यान मीनाक्षी अभिजीत मोहिते सध्या रा. गोडोली, सातारा या विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अभिजीत गोविंद मोहिते, सासरे गोविंद मार्तंड मोहिते, सासू कमल गोविंद मोहिते, नणंदा स्मिता गोविंद मोहिते, प्रियंका गोविंद मोहिते, स्नेहल गोविंद मोहिते सर्व राहणार लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार दिघे करीत आहेत.