सातारा, दि. १५ : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमठे येथील मनोज उर्फ सोन्या प्रकाश वाघमारे वय 32 यास कोरेगाव प्रांताधिकाऱ्यांनी तडीपार केलेले असताना तो दि. 14 रोजी दुपारी 4 वाजता आढळून आला. त्यावरुन बोरगाव पोलीस ठाण्याचे पो. कॉ. सतीश पवार यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. याचा तपास हवालदार कुंभार हे करत आहेत.