सातारा : अपघात प्रकरणी एका महिलेवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 जुलै रोजी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पानमळेवाडी तालुका सातारा येथील अरविंद गवळी कॉलेज च्या पार्किंग मध्ये त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या महिलेने एका विद्यार्थ्याच्या गाडीच्या पुढच्या साईडला धडक देऊन त्या विद्यार्थ्याच्या गाडीचे नुकसान केले. त्याबाबत विचारणा केली असता महिलेने त्यास शिवीगाळ करून तुला परीक्षेमध्ये नापास करून तुझे शैक्षणिक वर्ष वाया घालविन, खोट्या केस मध्ये अडकविन, अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एम. के. गायकवाड करीत आहेत.